मनोगत

आपणा सर्वांच्या आशिर्वादने लहान थोर यांच्या मार्गदर्शनाने आणि वाढ वडील पुर्वज यांच्या पुण्याईने सुमंगल वधुवर सूचक सेवा समाजकार्य याची (सर्व समाजातील. वधू वरांनसाठी) १९९६ साली स्थापना केली.
या संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली असून पुढील वाटचालीसाठी यक्षसवी पाउल, वधुवर इच्छुकांना घर बसल्या लग्न जुळवून घेण्यासाठी suvarnakshan.com वेबसाईट सुरू करण्यात आली असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत वधुवर इच्छुकांची माहिती प्रसिद्धी झाल्याने जास्तीत जास्त लग्न जुळवू लागली.

लोक म्हणतात की लग्न म्हणजे निव्वळ योगायोग समजावा हे जरी खरे असले तरी प्रयत्नाने जुळवून आणतो आम्ही हा योग , उदेश आमचा एकच की व्हावी सर्वांच्या मनाप्रमाणे इच्छापूर्ती, मुलीला मिळावा तिच्या प्रमानं योग्य पती अन् मुलाला मिळावी त्यांच्याप्रमाणे योग्य पत्नी , अर्थात योग्य साथिदार- जोडीदार आम्ही म्हणजे अर्थातच सुमंगल वधुवर सुचक सेवा हेच ऐकमेव आमचे ध्येय अन् लोकांच्या ओठांवरील सुहास्य हाच खरा आमचा अमुल्य ठेवा.

एकाचे एकविस होऊ द्या आणि पाचाचे पंचवीस होऊ द्या लग्न साऱ्यांची जुळवू द्या, महाराष्ट्र धर्म वाढू द्या
हे समाजकार्य फार मोठे. पुण्यवाण कार्य आहे. जशी मला साथ दिलीत तशीच नव्या संचालीका यांना दया

आपले स्नेहांकित.
जे. व्ही. परब (मास्तर),
माजी ( विशेष कार्याधिकारी )निर्वृत
महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार पुरस्कार
राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान (सल्लागार).